नाशिक महानगरपालिकेचा इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस मध्ये विक्रम १६००० विद्यार्थ्यांचा पर्यावरण पूरक शाडू मातीची मूर्ती बनविण्याचा यशस्वी उपक्रम

नाशिक महानगरपालिका व द गोदावरी ईनीशेटीव्ह स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विक्रम नाशिक शहरातील १२० शाळांमध्ये १६००० विद्यार्थ्यांनी शाडू मातीचा गणपती बनविण्याचा विक्रम प्रस्थापित केला.

नाशिक महानगरपालिकेत पर्यावरण विभागामार्फत पर्यावरणपुरक गणेशोत्सव राबविणे करीता नाशिक महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. शाडू मातीचे श्री गणेश मूर्ती बनविण्याकरिता महानगरपालिकेने ४५ टन माती उपलब्ध करून १२० शाळांमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता ३०० स्वयंसेवक, १२० प्रशिक्षक, १० फोटोग्राफर, यांचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने याप्रकारचा उपक्रम राबविली जाणारी महाराष्ट्रात पहिली महानगरपालिका असून यामुळे, १२० शाळांमध्ये१६ हजाराच्या वर इकोफ्रेंडली गणेश मूर्तीची निर्मिती झाली आहे.
पर्यावरणपूरवक हा उपक्रम असून गोदावरी संवर्धन करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेचे हे मोठे पाऊल आहे. येणारा सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरण पूरक करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मनपा मार्फत विविध उपक्रम राबविले जाणार आहे असे मत पर्यावरण उपायुक्त नितिन पवार यांनी मांडले, तसेच याकरीता महानगरपालिकेचे ३ महिन्याचे अथक परिश्रमातुण हा कार्यक्रम यशस्वी पार पडला असे डॉ. मिता चौधरी शिक्षण अधिकारी मनपा यांनी मत मांडले.


सदर कार्यक्रमाचा समारोप मराठा विद्या प्रसारक समाज हायस्कूल, नाशिक येथे पार पडला. विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण आणि गोदा संवर्धनचे संदेश कायमस्वरूपी रुजविण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे मत मराठा विद्यप्रसारक संस्थेचे प्रशासक मोगल यांनी मांडले. तसेच इंडिया बूक ऑफ रेकॉर्डसचे परीक्षण अधिकारी डॉ. अशोक अडक यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढे असे कार्यक्रम घेण्यास प्रोत्साहन देत महानगरपालिका आणि द गोदावरी इनीशेटीव्ह यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित केले
याकरीता नाशिक महानगरपालिका व गोदावरी इनीशेटीव्ह यांच्या संयुक्त प्रयत्नाने तसेच, एनसीसी, क्लीन इट आल, द ताज गेट वे, रोट्रॅक्ट क्लब, NMT लव कॉलेज, तीळभांडेश्वर् चित्रकला महाविद्यालय यांचे सहकार्य महानगरपालिकेस लाभले.
इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस चे परीक्षण अधिकारी डॉ अशोक अडक यांच्या कडून मनिषा खत्रीआयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका यांचा वतीने नितिन पवार उपायुक्त मनपा यांनी पुरस्कार स्वीकारला, याकरिता उपस्थित केंद्रीय प्रदूषण मंडळाचे राहुल बोबे, मराठा हायस्कूल चे थोरात सर, एनसीसी चे हवालदार विक्रम पाटील आदी उपस्थित होते.

Related posts

Leave a Comment