महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५ जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने “महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५” जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरातील परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व श्री. अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 🏆 पारितोषिकांचे स्वरूप राज्यस्तरीय पारितोषिके : जिल्हास्तरीय पारितोषिके : विशेष पारितोषिक : तालुकास्तरावर विजयी ठरलेल्या मंडळांना प्रत्येकी ₹ २५,०००/- इतके प्रोत्साहनपर पारितोषिक दिले जाणार आहे. 📌 अर्ज प्रक्रिया या…

Read More

राणेनगरात यंदाच्या गणेशोत्सवात साकार होणार वामन अवतार – हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानची अनोखी थीम

नाशिक (प्रतिनिधी) – राणेनगरातील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान यंदाच्या गणेशोत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेला वामन अवतार साकारत आहे. प्रतिष्ठान दरवर्षी गणेशोत्सवात सामाजिक व ऐतिहासिक संदेश देणाऱ्या अनोख्या थीम्स मांडते आणि यंदा भगवान विष्णूंच्या वामन अवताराची कथा सजीव करून दाखवण्याचा मानस आहे. पुराणकथेनुसार, वामन अवतारात भगवान विष्णूंनी राक्षसराज बलिचा अभिमान मोडला. वामन रूप धारण करून बलिकडून तीन पावलांत त्रैलोक्य व्यापून घेतले आणि त्याला पाताळात स्थान दिले. या कथेतून नम्रतेचा, भक्तीचा आणि सत्याच्या विजयाचा संदेश समाजापर्यंत पोहोचतो. गणेशोत्सवाच्या काळात प्रतिष्ठानच्या मंडपात भव्य देखावा साकारण्यात येणार आहे, ज्यामध्ये त्रैलोक्य व्यापणारा वामन, राजा बलिचे…

Read More

गणेशोत्सव मंडळांनी ‘ ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ स्वदेशी’ विषयी जनजागृती करावी 

मुंबई, : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत ‘ ऑपरेशन सिंदूर’ वर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत, त्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथी गृह येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री आढावा घेताना…

Read More

‘मुंबईचा सम्राट’ गणरायाला ७ फूट सोन्याची माळ अर्पण

मुंबई | प्रतिनिधीगेल्या २५ वर्षांपासून व्यवसायिक प्रगतीचा यशस्वी प्रवास करत असलेली एसकेएम स्टील्स ग्रुप ही नामवंत संस्था, आपल्या संस्थेवर लाभलेल्या श्री गणेशाच्या कृपाशिर्वादांचे स्मरण ठेवून, खेतवाडी ६ व्या गल्ली सार्वजनिक गणेश मंडळाच्या ‘मुंबईचा सम्राट’ या प्रतिष्ठित गणेशमूर्तीला ७ फूट लांबीची सोन्याची माळ अर्पण करत आहे. या उपक्रमाबद्दल माहिती देताना एसकेएम स्टील्स ग्रुपचे चिराग शाह यांनी सांगितले की, “गेल्या २५ वर्षांपासून बाप्पाचे मार्गदर्शन आणि कृपा आमच्यावर आहे. आमच्या प्रत्येक यशामागे त्याचीच प्रेरणा आहे. हि सोन्याची माळ म्हणजे आमच्या कृतज्ञतेचे लहानसे प्रतीक आहे.” खेतवाडी ६ व्या गल्लीचे गणेश मंडळ हे एसकेएम परिवाराचा…

Read More