‘मुंबईचा सम्राट’ गणरायाला ७ फूट सोन्याची माळ अर्पण

मुंबई | प्रतिनिधी
गेल्या २५ वर्षांपासून व्यवसायिक प्रगतीचा यशस्वी प्रवास करत असलेली एसकेएम स्टील्स ग्रुप ही नामवंत संस्था, आपल्या संस्थेवर लाभलेल्या श्री गणेशाच्या कृपाशिर्वादांचे स्मरण ठेवून, खेतवाडी ६ व्या गल्ली सार्वजनिक गणेश मंडळाच्या ‘मुंबईचा सम्राट’ या प्रतिष्ठित गणेशमूर्तीला ७ फूट लांबीची सोन्याची माळ अर्पण करत आहे.

या उपक्रमाबद्दल माहिती देताना एसकेएम स्टील्स ग्रुपचे चिराग शाह यांनी सांगितले की, “गेल्या २५ वर्षांपासून बाप्पाचे मार्गदर्शन आणि कृपा आमच्यावर आहे. आमच्या प्रत्येक यशामागे त्याचीच प्रेरणा आहे. हि सोन्याची माळ म्हणजे आमच्या कृतज्ञतेचे लहानसे प्रतीक आहे.”

खेतवाडी ६ व्या गल्लीचे गणेश मंडळ हे एसकेएम परिवाराचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. “या मंडळाकडून आम्हाला मिळालेलं प्रेम, स्नेह आणि सहकार्य अमूल्य आहे. आमच्या या भक्तिपूर्ण अर्पणामुळे आमच्यातील प्रेमाची वीण अधिक घट्ट होईल,” असेही शाह यांनी सांगितले.

एसकेएम स्टील्स ग्रुपने केलेली ही भक्तिपूर्ण आणि दानशूर भावना सणासणावारातील श्रद्धेचे आणि समाजातील परस्पर विश्वासाचे उत्तम उदाहरण म्हणून पाहिली जात आहे.

सदर कार्यक्रमास श्री चिराग शहा , एसकेएम स्टील्स ग्रुप तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री किरण शिंदे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Related posts

Leave a Comment