नाशिक महानगरपालिकेच्या, शहरातील मानाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे विधिवत पूजन,गणरायाची मनपाच्या वतीने प्रतिष्ठापना.

नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे विधिवत पूजन नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या हस्ते मेन रोड येथील नाशिक शहराच्या मानाच्या गणपतीची भक्तिभावाने पूजा करून करण्यात आले.

नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा कुंभमेळा आयुक्त करिष्मा नायर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ रामकुमार सौरीस सहाय,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा शहर अभियंता संजय अग्रवाल, उप आयुक्त लक्ष्मीकांत सातारकर, अजित निकत, नितीन पवार, सुवर्णा दखणे, मुख्य लेखाधिकारी श्री. दत्तात्रय पाथरूट, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, रवी बागुल, उपअभियंता निलेश चाळी जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा यांनी गणरायाचे पूजन करताना “आगामी गणेशोत्सव व पुढील कुंभमेळा पर्यावरणपूरक व विना विघ्न पार पडावा” अशा मंगलमय शुभेच्छा दिल्या. तर नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी “गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा होवो आणि आगामी कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संकल्प नाशिककर सर्वांनी करुया असा संदेश दिला.

मेन रोड येथील विधिवत पूजनानंतर राजीव गांधी भवन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नाशिक महानगरपालिका येथे देखील जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, सिरस सहाय यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.

या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून अतिथी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भक्तिभाव, उत्साह आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देत यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवा साजरा करण्याचे आवाहन या वेळी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.

Related posts

Leave a Comment