नाशिक महानगरपालिकेच्या, शहरातील मानाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे विधिवत पूजन,गणरायाची मनपाच्या वतीने प्रतिष्ठापना.

नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे विधिवत पूजन नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या हस्ते मेन रोड येथील नाशिक शहराच्या मानाच्या गणपतीची भक्तिभावाने पूजा करून करण्यात आले. नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा कुंभमेळा आयुक्त करिष्मा नायर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ रामकुमार सौरीस सहाय,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा शहर अभियंता संजय अग्रवाल, उप आयुक्त लक्ष्मीकांत सातारकर, अजित निकत, नितीन पवार, सुवर्णा दखणे, मुख्य लेखाधिकारी श्री. दत्तात्रय पाथरूट, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, रवी बागुल, उपअभियंता निलेश चाळी जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांसह मान्यवर…

Read More

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५ जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने “महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५” जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरातील परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व श्री. अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 🏆 पारितोषिकांचे स्वरूप राज्यस्तरीय पारितोषिके : जिल्हास्तरीय पारितोषिके : विशेष पारितोषिक : तालुकास्तरावर विजयी ठरलेल्या मंडळांना प्रत्येकी ₹ २५,०००/- इतके प्रोत्साहनपर पारितोषिक दिले जाणार आहे. 📌 अर्ज प्रक्रिया या…

Read More

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची जोरदार तयारी – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची घोषणा

वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकात रोशनाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. यावेळी प्रथमच राज्य शासन उत्सवात सहभागी होणार असून यासाठी शासनाने सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे. याबाबत मंत्री ॲड. शेलार म्हणाले, “जगात आणि देशात आपल्या गणेशोत्सवाची ओळख सर्वात मोठा महोत्सव म्हणून झालेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

नाशिक महानगरपालिकेचा इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस मध्ये विक्रम १६००० विद्यार्थ्यांचा पर्यावरण पूरक शाडू मातीची मूर्ती बनविण्याचा यशस्वी उपक्रम

नाशिक महानगरपालिका व द गोदावरी ईनीशेटीव्ह स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विक्रम नाशिक शहरातील १२० शाळांमध्ये १६००० विद्यार्थ्यांनी शाडू मातीचा गणपती बनविण्याचा विक्रम प्रस्थापित केला. नाशिक महानगरपालिकेत पर्यावरण विभागामार्फत पर्यावरणपुरक गणेशोत्सव राबविणे करीता नाशिक महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. शाडू मातीचे श्री गणेश मूर्ती बनविण्याकरिता महानगरपालिकेने ४५ टन माती उपलब्ध करून १२० शाळांमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता ३०० स्वयंसेवक, १२० प्रशिक्षक, १० फोटोग्राफर, यांचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने याप्रकारचा उपक्रम राबविली जाणारी महाराष्ट्रात पहिली महानगरपालिका असून यामुळे, १२० शाळांमध्ये१६ हजाराच्या वर इकोफ्रेंडली गणेश मूर्तीची निर्मिती झाली आहे.पर्यावरणपूरवक हा…

Read More

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या

मुंबई, दि. १९ : – गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू. या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी रेल्वेचा आधार महत्वाचा ठरतो. यासाठी यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा ३६७ जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देतानाच, राज्यातील तमाम गणेशभक्तांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगाने महाऱाष्ट्र शासनाने रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेला गणेशभक्तांच्या सुविधेसाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद…

Read More

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात शहरातील गणेशोत्सव पदाधिकाऱ्यांची बैठक मनपात संपन्न

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिनांक २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीकरिता शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मनपामध्ये उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थिती होऊन मौलिक सूचनांची दखल आयुक्त यांनी घेतली. बैठकीत शहरातील विविध सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सव सुरळीत व यशस्वीपणे पार पडावा यासाठी मौलिक सूचना मांडल्या. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, माजी नगरसेवक गजानन शेलार, राजेंद्र बागुल, सुरेश दलोड रामसिंग बावरी यांनी परवानगीसाठी एकखिडकी योजना, मिरवणुकीच्या मार्गावरील तसेच मंडप परिसरातील झाडांच्या फांद्यांची छाटणी, उत्सवाच्या काळात शहर परिसर पूर्ण…

Read More

राणेनगरात यंदाच्या गणेशोत्सवात साकार होणार वामन अवतार – हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानची अनोखी थीम

नाशिक (प्रतिनिधी) – राणेनगरातील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान यंदाच्या गणेशोत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेला वामन अवतार साकारत आहे. प्रतिष्ठान दरवर्षी गणेशोत्सवात सामाजिक व ऐतिहासिक संदेश देणाऱ्या अनोख्या थीम्स मांडते आणि यंदा भगवान विष्णूंच्या वामन अवताराची कथा सजीव करून दाखवण्याचा मानस आहे. पुराणकथेनुसार, वामन अवतारात भगवान विष्णूंनी राक्षसराज बलिचा अभिमान मोडला. वामन रूप धारण करून बलिकडून तीन पावलांत त्रैलोक्य व्यापून घेतले आणि त्याला पाताळात स्थान दिले. या कथेतून नम्रतेचा, भक्तीचा आणि सत्याच्या विजयाचा संदेश समाजापर्यंत पोहोचतो. गणेशोत्सवाच्या काळात प्रतिष्ठानच्या मंडपात भव्य देखावा साकारण्यात येणार आहे, ज्यामध्ये त्रैलोक्य व्यापणारा वामन, राजा बलिचे…

Read More

गणेशोत्सव मंडळांनी ‘ ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ स्वदेशी’ विषयी जनजागृती करावी 

मुंबई, : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत ‘ ऑपरेशन सिंदूर’ वर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत, त्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथी गृह येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री आढावा घेताना…

Read More

‘मुंबईचा सम्राट’ गणरायाला ७ फूट सोन्याची माळ अर्पण

मुंबई | प्रतिनिधीगेल्या २५ वर्षांपासून व्यवसायिक प्रगतीचा यशस्वी प्रवास करत असलेली एसकेएम स्टील्स ग्रुप ही नामवंत संस्था, आपल्या संस्थेवर लाभलेल्या श्री गणेशाच्या कृपाशिर्वादांचे स्मरण ठेवून, खेतवाडी ६ व्या गल्ली सार्वजनिक गणेश मंडळाच्या ‘मुंबईचा सम्राट’ या प्रतिष्ठित गणेशमूर्तीला ७ फूट लांबीची सोन्याची माळ अर्पण करत आहे. या उपक्रमाबद्दल माहिती देताना एसकेएम स्टील्स ग्रुपचे चिराग शाह यांनी सांगितले की, “गेल्या २५ वर्षांपासून बाप्पाचे मार्गदर्शन आणि कृपा आमच्यावर आहे. आमच्या प्रत्येक यशामागे त्याचीच प्रेरणा आहे. हि सोन्याची माळ म्हणजे आमच्या कृतज्ञतेचे लहानसे प्रतीक आहे.” खेतवाडी ६ व्या गल्लीचे गणेश मंडळ हे एसकेएम परिवाराचा…

Read More

महाराष्ट्रातील गणपती उत्सव

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि भाविकता पूर्वक साजरा केला जाणारा सण आहे. विशेषतः लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करून या सणाला सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे रूप दिले. 🕉️ गणपती बाप्पा मोरया: महाराष्ट्रात “गणपती बाप्पा मोरया!” या जयघोषाने वातावरण दुमदुमते. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत (१० दिवस) हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 🔸 उत्सवाची वैशिष्ट्ये: 🔸 महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती: गणेशोत्सवाचा सामाजिक महत्त्व:

Read More