नाशिक : हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ, शहीद भगतसिंग चौक, द्वारका, नाशिक यांच्या वतीने गणेशोत्सव २०२५ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंडळाच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष म्हणून सौ. प्रियंका सागर अहिरराव यांची निवड करण्यात आली असून हा एक ऐतिहासिक निर्णय ठरला आहे.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक दशके हे मंडळ सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर राहिले आहे. यंदाच्या कार्यकारिणीत विविध अनुभवी तसेच नव्या पिढीतील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
- अध्यक्ष: सौ. प्रियंका सागर अहिरराव
- कार्याध्यक्ष: सुभाष जाधव सर
- उपाध्यक्ष: कुं. मंगला पवार, प्रकाश गायकवाड, उमेश पाटील
- सरचिटणीस: अतुल रणशिंगे
- सचिव: कल्पना गायकवाड
- सहचिटणीस: स्वप्निल काथवटे
- खजिनदार: प्रसाद बावरी
सल्लागार मंडळ:किरणसिंग पवार, महादु बेंडकुळे, सुरेश पवार, श्याम पवार, अनिल जाधव, अशोक गांगुर्डे, बाळासाहेब मोरे,करणसिंग बावरी, किशोर बागमार,बाळासाहेब कऱ्हाड,प्रतापसिंग पवार,किशोर बोचके,सुनील साळवे,हिरामण वाईकर
स्वयंसेवक सदस्य:
राजेश धुमाळ,जीवा पवार, राजाभाऊ गाडगीळ, प्रतीक कसबे, शुभम गाडे, भारत सदभैय्या, रोशन जाधव, गुरुदेव पवार, नितीन काथवटे, आदित्य भालेराव, कुणाल चव्हाण, प्रेम पवार, ओम चव्हाण, मोहन खाडे, संजय पिंपळके, रुद्र सकट ,नाना वाघ,भारत शेट्टी व परिसरातील नागरिक
मंडळाच्या वतीने या वर्षी देखील सामाजिक भान असलेला देखावा साकारण्यात येणार असून, सार्वजनिक सहभाग आणि अनुशासनबद्ध उत्सव साजरा करण्यावर भर दिला जाणार आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरणार आहे.