नाव : श्री गणेश / गणपती बाप्पा
आई-वडील : शिवशंकर व पार्वती
वाहन : उंदीर ( मूषक)
शस्त्र : परशु (कुऱ्हाड), अंकुश, पाश
अवयव : मोठे डोके (बुद्धीचं प्रतीक), मोठे कान (सर्व
ऐकणं), सोंड (स्मार्टनेस/अडचणी सोडवण्याची ताकद )
पंचांग : चतुर्थी (विशेषतः भाद्रपद शुद्ध चतुर्थी – गणेश चतुर्थी)
मूल मंत्र : “ॐ गं गणपतये नमः”

गणेश चतुर्थी सण
गणेश चतुर्थी हा त्यांचा जन्मोत्सव मानला जातो. हा सण १० दिवस साजरा केला जातो.
लोक घरी किंवा मंडपात गणपतीची मूर्ती आणतात, पूजन करतात, आणि “गणपती बाप्पा मोरया!” असा जयघोष करतात.
अनंत चतुर्दशी दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते.
गणपतीचे प्रमुख नाव ( द्वादश नाम )
1. सुमुख
2. एकदंत
3. कपिल
4. गजकर्णक
5. लंबोदर 6. विकट
7. विघ्नराज
8. गणाधिप
9. धूम्रवर्ण
10. भालचंद्र
11. विनायक
12. गणपति
गणपती बाप्पा भक्तीतून लाभ
बुद्धी व ज्ञान वाढते.
अडचणी दूर होतात.
नवा काम सुरू करताना गणपतीचे प्रथम पूजन केल्याने शुभ फल मिळते. गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया !